'आयसीजे'च्या न्यायाधीशपदी भारताचे दलवीर भंडारी

dalveer bhandari
dalveer bhandari

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) नामांकन भरलेल्या भारताच्या दलविर भंडारी यांची फेरनिवड झाली आहे. ब्रिटेनच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांनी अगदी अखेरच्या टप्प्यात उमेदवारी मागे घेतल्याने भंडारी यांची फेरनिवड होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आता भंडारी हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारणार आहेत.

ब्रिटेनच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड आणि भंडारी यांच्यात सुरवातीला अटीतटीची लढाई सुरु होती. भंडारी यांनी निवडणुकीच्या 11 राऊंडमध्ये मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे अखेरीस ग्रीनवूड यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे भंडारी यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. भंडारी यांना 193 पैकी 183 मते मिळाली. यामध्ये सुरक्षा परिषदेतील सर्व 15 जणांचा समावेश आहे. 

आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची पाचवी रिक्त जागा भरण्यासाठी संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. या निवडणुकीत भंडारी यांच्यासह अन्य दोघे न्यायाधीश म्हणून काम पहात होते. ही निवडणूक संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात पार पडली. 

''सर ख्रिस ग्रीनवुड यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या फेरनिवडणुकीत माघार घेण्याचे सांगण्यात आले होते. तसेच इंग्लंडला ही निवडणूक जिंकण्यास कठीण वाटल्यास आम्ही आमच्या जवळचा मित्र भारत देशाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार होतो. आम्ही भारताला यापुढे सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत'', असे संयुक्त राष्ट्रसंघातील ब्रिटेनचे प्रतिनिधी मॅथ्यू रिक्रॉफ्ट यांनी सांगितले.

''आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कामकाजात इंग्लंड कायम सोबत असेल. आम्ही जे वचन दिले होते, ते पाळण्यासाठी कटिबद्ध आहोत. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघाने या निवडणुकीसाठी सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचा अमूल्य वेळ घेतला आहे, याबाबत आम्ही नाराज आहोत, असे रिक्रॉफ्ट म्हणाले. तसेच त्यांनी भारताच्या भंडारी यांच्यासह इतर न्यायाधीशांचे त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. 

दरम्यान, भंडारी यांच्या फेरनियुक्तीवरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 'वंदे मातरम्' म्हणत त्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com