अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

या ड्रोन हल्ल्यामध्ये तालिबान-हक्कानी नेटवर्कच्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, तालिबानचा म्होरक्या सजना महसूद यात ठार झाला आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानच्या हद्दीत करण्यात आलेला हा दुसरा ड्रोन हल्ला आहे.

नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर जगभरातून टीका केली जात आहे. त्यानंतर आज अमेरिकेकडून पाकिस्तानवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हा ड्रोन हल्ला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेलगत असणाऱ्या वजिरीस्तान प्रांतात करण्यात आला. 

America drone

यापूर्वी 24 जानेवारी रोजी अमेरिकेकडून ड्रोन हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेकडून आता पुन्हा एकदा ड्रोन हल्ले करण्यात आले. या ड्रोन हल्ल्यामध्ये तालिबान-हक्कानी नेटवर्कच्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, तालिबानचा म्होरक्या सजना महसूद यात ठार झाला आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानच्या हद्दीत करण्यात आलेला हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. या हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचा एक कमांडरसह इतर दोघांना ठार करण्यात आले होते.

Web Title: Marathi News International News America Drone Attack 4 terrorist