इन्फोसिसचे प्रवर्तक हिस्सा विकणार नाहीत! 

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जून 2017

बंगळूर - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने कंपनीतील हिस्सा सहसंस्थापक विकणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे. नारायण मूर्तींसह सर्व प्रवर्तक कंपनीतील हिस्सा विकणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 

कंपनीने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की कंपनीचे प्रवर्तक हिस्सा विकणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. ही अफवा असून, प्रवर्तकांनीही याचा इन्कार केला आहे. कंपनीत सध्या तरी अशी काही घडामोड सुरू नाही. त्यामुळे माध्यमांनी अशा अफवांना खतपाणी घालू नये. कंपनी आणि भागधारकांच्या हिताला यामुळे बाधा निर्माण होत आहे. 

इन्फोसिस ही देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. मूर्ती यांच्यासह कंपनीचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी, क्रिस गोपालकृष्णन, एस. डी. शिबूलाल आणि के. दिनेश हे कंपनीतील एकूण 28 हजार कोटी रुपयांचा हिस्सा विकणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले होते. कंपनीतून हे सहसंस्थापक बाहेर पडल्यानंतर मागील तीन वर्षातील कंपनीच्या कामकाज आणि कार्यपद्धतीवरुन ते नाराज झाले आहेत, असे वृत्तात म्हटले होते. 

याआधी सहसंस्थापक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीतील 2.84 टक्के हिस्सा 6 हजार 284 कोटी रुपयांना विकला आहे. सहसंस्थापकांचे सध्याच्या व्यवस्थापनाशी कंपनी प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन या मुद्‌द्‌यावर अनेक वेळा उघड वाद झाले होते. फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या अनेक निर्णयांवर प्रश्‍न उपस्थित करणारे पत्र सहसंस्थापकांनी पाठविले होते. 

वादाच्या मुळाशी व्यवस्थापन 
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बन्सल यांना नोकरी सोडताना देण्यात आलेल्या पॅकेजबद्दल सहसंस्थापकांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. तसेच, कंपनीचे प्रमुख विशाल सिक्का यांना देण्यात आलेल्या 1 कोटी 10 लाख डॉलरच्या वेतनवाढीबद्दल त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. याचबरोबर नारायण मूर्ती यांनी कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांची कपात करण्याऐवजी वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी वेतन कपात घ्यावी, असे आवाहनही व्यवस्थापनाला केले होते.