सत्ता गेल्याने मुख्यमंत्र्यांचे फुटीरतावाद्यांना समर्थन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

नवी दिल्ली - जम्मू - काश्‍मीरमध्ये सत्तेबाहेर गेले की मुख्यमंत्री नेहमी फुटीरतावाद्यांचे समर्थक बनतात, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले, ""फुटीरतावादी नेते साऱ्या सवलती घेतात. ते तिकिटात सूट घेतात, रुग्णांलयात अल्प दरांत उपचार करतात, दिल्लीत राजकीय सत्ताकेंद्रांत लॉबिंग करतात. एवढे सारे करूनही ते देशाच्या घटनेशी बांधील राहण्यास नकार देतात. राज्यातील अनेक महत्त्वाच्या पक्षांचे नेते सत्ता गेली की फुटीरतावाद्यांच्या बाजूने बोलू लागतात. हे नेते जेव्हा मुख्यमंत्री असतात तेव्हा पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले का करत नाहीत, असा सवाल केंद्रीय गृहमंत्र्यांना करतात. मात्र, सत्ता जाताच ते एका रात्रीत शहाणे बनतात. मी तुम्हाला पैज लावून सांगतो, त्यांना तुम्ही पुन्हा सत्ता दिल्यास ते भारताच्या बाजूने बोलू लागतील.