'ओखी'वरील जोक्सचा गडगडाटासह वर्षाव!

Okhi
Okhi

देशभर ओखी चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत असतानाच ओखीवर येणाऱ्या विनोदांची व्हॉट्सअॅपवर जणू काही भरतीच आली आहे. विनोदवीरांची तल्लख बुध्दी कधी जागी होईल सांगता येत नाही आणि यातून 'ओखी'देखील सुटले नाही. जसा किनारपट्टीवर ओखीमुळे धो-धो पाऊस कोसळतोय, त्याचप्रमाणे सोशल मिडीयावर ओखीवर होणाऱ्या जोक्सचा वर्षाव होतोय. या ऐन मौसमात पडणाऱ्या पावसामुळे सर्वांचीच धांदल उडाली आहे, पण ओखीवर होणारे जोक्स् वाचून नेटिझन्सचं चांगलंच मनोरंजन होत आहे. अखेर अशा ह्युमर्समधून ओखीसुद्धा सुटले नाही..! 

असेच काही ओखीवरील वादळी जोक्स् तुमच्यासाठी -

ये कैसा महिना है गालिब....??? 
पहाटे को हिवाळा! 
दुपार को उन्हाळा!अन् रात्री को पावसाळा!
ऐसा अगर चलता रहा तो शेत मे क्या उगेंगा....शेवाळा? 
आठवले म्हणुन पाठवले
------

''आमच्याकडे स्वेटरला प्लॅस्टीक लाऊन मिळेल'' - पुणेरी दुकानातील पाटी
------
ओख्खी हे वादळाचं नाव आहे हे आजच आम्हाला कळले
.
.
.

आम्हाला अजूनपर्यंत ओख्खी ओख्खा वाख्खा हा धूमधडाक्यातला अशोक सराफांचा खोकलाच माहीत होता...
------
च्या मायला पुन्हा पावसाळा आला..
आता दिवाळी येणार..परत बोनस, 
होय हे माझ सरकार आहे..
मी लाभार्थी..!

------
गंभीर प्रश्न
.
.
.
सांताक्लॉज येणार आहे की गणपती??

------
कुणाची पावसाळी पिकनिक राहिली असेल तर उरकुन घ्या पटकन...तो आलाय परत!
------
पूर्वी चार महिने उन्हाळा, चार महिने पावसाळा, चार महिने हिवाळा..
आता ८ तास उन्हाळा, ८ तास पावसाळा, ८ तास हिवाळा

------
असं वाटतंय पूर्वीच्या पिढीपेक्षा आताची पिढी जास्त पावसाळे पहातेय..!
------
गुजरातमध्ये आज हवा कोणाची? 
ना भाजपची, ना काँग्रेसची,
फक्त ओखी चक्रीवादळाची.....

------
वो गणपती मे आता है, 
वो नवरात्र मे भी आता है,
वो ईद मे भी आ चुका,
वो ख्रिसमस मे भी आयेगा...
बारीश का कोई धर्म नही होता सहाब!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com