पीडब्ल्यूडीचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

संजय सूर्यवंशी
बुधवार, 13 डिसेंबर 2017

सुरेश भीमनायक हे कित्तूर येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता म्हणून काम करतात. हनुमाननगर सर्कलमध्ये त्यांचा बंगला आहे. याशिवाय खानापूर तालुक्यातील मोदेकोप येथे सुमारे 30 हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फॉर्म आहे. तसेच कुवेम्पुनगर येथे साडेसात हजार चौरस फुटाचा भूखंड असून येथे औटहाऊस आहे. कार्यालयासह या चार ठिकाणी आज एकाच वेळी एसीबीने छापा टाकला.

बेळगाव - सार्वजनिक बांधकाम खात्याचे कित्तूर येथील अभियंता सुरेश लक्ष्मण भीमनायक (रा. हनुमाननगर, बेळगाव) यांच्या मालमत्तेवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) छापा टाकला. बेळगावसह खानापूर तालुक्यातील त्यांच्या स्वतःच्या तीन ठिकाणच्या मालमत्ता, कार्यालय व त्यांच्या दोन नातेवाईकांच्या मालमत्तेवर आज सकाळी नऊ वाजता एकाच वेळी छापा टाकण्यात आला. भीमनायक यांनी उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याची माहिती मिळाल्यावरून हा छापा टाकल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुरेश भीमनायक हे कित्तूर येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता म्हणून काम करतात. हनुमाननगर सर्कलमध्ये त्यांचा बंगला आहे. याशिवाय खानापूर तालुक्यातील मोदेकोप येथे सुमारे 30 हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फॉर्म आहे. तसेच कुवेम्पुनगर येथे साडेसात हजार चौरस फुटाचा भूखंड असून येथे औटहाऊस आहे. कार्यालयासह या चार ठिकाणी आज एकाच वेळी एसीबीने छापा टाकला. याशिवाय टिव्ही सेंटर तसेच कॅम्प येथे त्यांचे नातेवाईक आहेत. तेथेही अधिकार्‍यांनी छापा टाकून चौकशी केली.

एसीबीचे बेळगाव विभागाचे उपधीक्षक जे. रघु, पोलिस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी, श्री धरनाईक यांनी खानापूर बेळगाव परिसरातील छाप्यांमध्ये सहभाग घेतला. हावेरी, विजापूर व बेळगाव येथील दोघे उपअधिक्षक, सहा पोलिस निरीक्षक व त्यांचे 30 सहकारी यांनी या सर्व छाप्यांमध्ये सहभाग घेतला. भीमनायक यांच्या सर्व ठिकाणाहून काही रोख रक्कम व मालमत्तेची कागदपत्रे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Marathi News Karnataka Belgaon ACB PWD Engineer