कार्ती चिदंबरम यांना 22 मार्चपर्यंत दिलासा

पीटीआय
गुरुवार, 15 मार्च 2018

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात कार्ती चिदंबरम यांना दिलासा देताना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अटकेपासून अंतरिम दिलाशाची मुदत 20मार्चवरून वाढवून 22 मार्च केली.

ईडीने न्यायालयाच्या या निर्णयावर कोणतीही आपत्ती दर्शविली नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 मार्चला होईल. 

यापूर्वी न्यायालयाने कार्ती यांना ईडीच्या अटकेपासून 20 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा दिला होता. न्यायाधीश एस. मुरलीधर आणि न्यायाधीश आय. एस. मेहता यांनी सुनावणीची तारीख 20वरून 22 मार्च केली. कार्ती यांच्या वकिलाने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल 20 मार्चला उपलब्ध नसल्याचे सांगितल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला.

सिब्बल हे या प्रकरणात कार्ती यांची बाजू मांडत आहेत. केवळ सुनावणीची तारीख बदलल्यामुळे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोणताही आक्षेप नसल्याची सूचना दिल्याने या निर्णयावर विरोध दर्शविला नसल्याचे सक्तवसुली संचालनालयाचे वकील विनोद दिवाकर यांनी सांगितले.

Web Title: marathi news Karti Chidambaram INX Media scam