महिला न्यायाधिशाची पोलिसास मारहाण; गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

देहरादून : उत्तर प्रदेशात न्यायाधिश असलेल्या महिलेने देहरादूनमधील प्रेम नगर पोलीस ठाण्यात पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणातील न्यायाधिश महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

जया पाठक असे संबंधित न्यायाधिशांचे नाव आहे. त्या उत्तर प्रदेशात अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश पदावर काम करतात. अलाहाबाद उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

'पाठक यांच्यावर सरकारी कर्मचाऱयाला मारहाण करणे, सरकारी कर्मचाऱयाच्या कामात अडथळा आणणे, जाणिवपूर्क अपमान करणे आणि गुन्हेगारी कृत्य यासंदर्भातील कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत,' असे पोलिसांनी सांगितले. 

पाठक यांचा मुलगा कॉलेजमध्ये शिकतो. कॉलेजमधील मारहाणप्रकरणी चौकशीसाठी त्याला पोलिसांनी ठाण्यावर बोलावले होते. त्याचा राग येऊन पाठक स्वतः ठाण्यात आल्या आणि त्यांनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरूवात केली. 12 सप्टेंबरच्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.