मोदींसह मान्यवरांकडून नेहरूंना जयंतीनिमित्त आदरांजली

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 128व्या जयंतीनिमित्त त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. 

नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 128व्या जयंतीनिमित्त त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. 

भारतीय-आशियाई शिखर परिषदेसाठी मनिला येथे गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना' अशा शब्दांत ट्विट करून अभिवादन केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर, 1889 साली अलाहाबाद येथे झाला होता. हा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो. 

"मुर्खपणा जेव्हा कृतीशील असतो तेव्हा त्यापेक्षा भयावह काहीही नसते," हे नेहरू यांचे विधान देऊन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आज आपण एका तेजस्वी कनवाळू व्यक्तीचे स्मरण करत आहोत.

'भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशाला हार्दिक शुभेच्छा' अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवरून अभिवादन केले. 
आधुनिक स्वतंत्र भारताचा पाया ज्यांनी रचला असे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना माझी विनम्र आदरांजली, असे लिहित शरद पवार यांनी नेहरूंचे लहान मुलांसोबतचे छायाचित्र ट्विट केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :