मानसरोवर यात्रेत चीनमुळे व्यत्यय

पीटीआय
सोमवार, 26 जून 2017

गंगटोक - कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारल्यामुळे अनेक यात्रेकरू माघारी परतले असून, यामुळे चीनचा आडमुठेपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

गंगटोक - कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारल्यामुळे अनेक यात्रेकरू माघारी परतले असून, यामुळे चीनचा आडमुठेपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

सिक्कीमधील नथु ला मार्गे मानसरोवर येथे यात्रेनिमित्त जाणाऱ्या 50 भाविकांची तुकडी 20 जून रोजी येथे दाखल झाली होती; मात्र आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतरही त्यांना पुढे वाटचाल शक्‍य नसल्याचे स्पष्ट झाले. चीनच्या लष्कराने या भाविकांना आपल्या सीमाहद्दीत प्रवेश करण्यास मज्जाव केला. चीनमधील खराब हवामान हे यामागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सर्व यात्रेकरूना माघारी पाठविण्याच्या सूचना सिक्कीम पर्यटन विभागास केल्या असून, यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट होते. कैलास पर्वताकडे जाण्यासाठी उत्तराखंडमधील पिथ्तोरागड हा आणखी एक मार्ग असून, तो धोकादायक मानला जातो. त्यामुळे नथु ला हा चिनी (तिबेट) हद्दीतून जाणारा पर्यायी मार्ग 2015 मध्ये खुला झाला होता.