गोरखपूरमध्ये बळींची संख्या 63; 'हा नरसंहारच' : कैलास सत्यार्थी 

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

गोरखपूर : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्राणवायूचे सिलिंडर न मिळाल्याने गोरखपूरमधील सरकारी रुग्णालयामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 63 पर्यंत गेला आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघामध्येच हा हलगर्जीपणा दिसून आला आहे. 

गोरखपूरमधील बीआरडी रुग्णालयात गेल्या सहा वर्षांत तीन हजार मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'हिंदुस्थान टाईम्स'ने प्रसिद्ध केले आहे. या घटनेवरून समाजाच्या सर्व स्तरांतून प्रशासन आणि राज्य सरकारवर तीव्र टीका होत आहे. नोबेल विजेते कैलास सत्यार्थी यांनी या घटनेचा उल्लेख 'नरसंहार' असा केला आहे. 

या रुग्णालयामध्ये प्राणवायूचे सिलिंडर पुरविण्याचे कंत्राट असलेल्या कंपनीचे 66 लाख रुपयांचे बिल थकविण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीने सिलिंडरचा पुरवठा बंद केला. लिक्विड ऑक्‍सिजनही गुरुवार दुपारपासून बंद झाला होता. इतकेच नव्हे, तर रुग्णालयातील डॉक्‍टर आणि इतर कर्मचाऱ्यांनाही फेब्रुवारीपासून वेतन दिलेले नाही. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे रुग्णांना जीव गमवावे लागले आहेत. 

रुग्णांचा जीव गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने आता तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. आशुतोष टंडन आणि सिद्धार्थनाथ सिंह हे दोन मंत्री बीआरडी रुग्णालयामध्ये बैठकीसाठी दाखल झाले आहेत. 

या घटनेनंतर विरोधी पक्षांनीही टीका करण्याची संधी साधली आहे. 'या प्रकरणात दोन घटक जबाबदार आहेत. रुग्णालय प्रशासन, सिलिंडर पुरविणारी कंपनी आणि जिल्हा प्रशासन यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा' अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली. 'राज्य सरकारचे त्यांच्या जबाबदारीकडे लक्ष नाही. समाजवादी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याकडे त्यांचे लक्ष आहे. योगी आदित्यनाथ यांचे सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे. हे सरकार या घटनेमागील सत्य दडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते हे सत्य शोधून काढतील', असा इशारा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिला.