रमणसिंह यांचा भ्रष्टाचार दिसत नाही का? : राहुल 

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जुलै 2017

रायपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारावर सारखे बोलतात; मात्र त्यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांचा भ्रष्टाचार दिसत नाही, असा आरोप आज कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जगदलपूर येथील सभेत केला. पनामा पेपरमध्ये नाव आल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला. त्यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचे देखील नाव होते; परंतु त्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही, असेही गांधी यांनी नमूद केले. 

राहुल गांधी सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी नोटाबंदी, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, जीएसटी आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका केली. भाजपने आज जम्मू- काश्‍मीर, उत्तर-पूर्व राज्यांत असंतोष निर्माण केला आहे.

महिलांना मारहाण होत असून अत्याचारही होत आहेत. याबाबत मोदी काहीच बोलत नाहीत. कॉंग्रेस कार्यकर्त्यांवरदेखील अत्याचार झाले असून, आता एक होऊन भाजपचा मुकाबला करणार आहोत. 2014 पर्यंत जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद संपला होता. आज परिस्थिती ढासळली आहे. जम्मू- काश्‍मीर आज संकटात आहे. पश्‍चिम बंगाल, तमीळनाडू, छत्तीसगड, सिक्कीम आणि पूर्वेत्तर राज्यांत अशांतता आहे. यूपीएच्या काळात शांतता होती, असेही राहुल म्हणाले.