'ईडी'च्या अधिकाऱ्याची सर्वोच्च न्यायालयात धाव 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : '2जी' गैरव्यवहाराचा तपास करणारे सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी राजेश्वर सिंह यांनी आपल्याला खोट्या तक्रारीत गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

'2जी' गैरव्यवहाराचा तपास राजेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, एअरसेल-मॅक्‍सिस' प्रकरणातील संशयिताच्या 1.6 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीकडून नुकतीच टाच आणण्यात आली होती. त्यानंतर लगेच आपल्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकाराची सीबीआयद्वारे चौकशी करावी किंवा आपल्याला या तपास कामातून मुक्त करावे, अशी मागणी राजेश्वर यांनी न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी केंद्र सरकार, ईडी; तसेच सीबीआयने तीन आठवड्यांत आपले म्हणणे सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

राजेश्वर यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचनाही न्यायालयाने संबंधितांना केल्या आहेत. दरम्यान, '2जी' गैरव्यवहाराच्या चौकशीत अनेकदा हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न झाल्याचा दावा राजेश्वर यांचे वकील गोपाळ शंकरनारायणन यांनी केला. या तक्रारीचा परिणाम राजेश्वर यांच्या संभाव्य पदोन्नतीवर होण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. 

माझ्या माहितीनुसार, सिंह हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. मात्र, वरिष्ठ कार्यालयातील लोकांकडून अशा प्रकरणांत हस्तक्षेप का होतो हे मला समजत नाही 
- सुब्रमण्यम स्वामी