बिहारमधील पूरबळींची संख्या 98 वर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93 लाख लोक प्रभावित झाले आहेत. नेपाळ तसेच राज्याच्या उत्तर भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. 

राज्याच्या आरोग्य विभागाने मदतीच्या दृष्टीने लोकांसाठी 104 हा टोल फ्री क्रमांक आज सुरू केला आहे. 

अरारिया जिल्ह्यात सर्वाधिक वीस जणांचा बळी गेला आहे. त्याखालोखाल पूर्व चंपारण्य (14), पश्‍चिम चंपारण्य (13), मधेपुरा (12), सीतामर्थी (11), किशनगंज (8), पूर्णिया (5), मधुबनी (5), दरभंगा (4) येथे पुराने लोकांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आज पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. आतापर्यंत साडेतीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलेले आहे. त्यांची 514 मदत छावण्यांत व्यवस्था करण्यात आली आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशातही पुराचा तडाखा बसला असून, गेल्या तीन दिवसांत बलरामपूर, बहारिच जिल्ह्यांत पंधरा जणांचा बळी गेला आहे. राज्यातील बाराबंकी, गोंडा, सिद्धार्थनगर, महाराजगंज या जिल्ह्यांतील जनजीवन पुरामुळे विस्कळित झाले आहे.