दिल्ली : अस्खलित इंग्रजीत बोलला म्हणून तरुणास मारहाण

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली : 'मित्रांशी अस्खलित इंग्रजीमध्ये का बोलत होतास' अशी विचारणा करत राजधानी दिल्लीमध्ये पाच जणांनी एका 22 वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाचही आरोपींनी नशेच्या भरात हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात तीन जणांना अटक झाली आहे. 

गेल्या शनिवारी ही घटना घडली. नोएडा येथे राहणारा वरुण गुलाटी हा तरुण शनिवारी पहाटे त्याच्या मित्राला कॅनॉट प्लेस येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोडण्यासाठी आला होता. मित्राला सोडून वरुण तिथून निघत असतानाच नशेत असलेल्या पाच जणांनी त्याला घेरले. 'इंग्रजीमध्ये का बोलत होतास' अशी विचारणा करत त्या आरोपींनी वरुणशी वाद घालण्यास सुरवात केली. त्यानंतर या पाच जणांनी वरुणला बेदम मारहाण केली. 

मारहाण करून पाचही जण घटनास्थळावरून पळून गेले; मात्र वरुणने त्यांच्या गाडीचा क्रमांक टिपून घेतला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.