थँक्‍यू वर्ल्ड बँक..! : पंतप्रधान मोदी 

वृत्तसंस्था
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : देशातील उद्योगानुकूल वातावरणाची दखल घेत 'इज ऑफ डुईंग बिझनेस'च्या यादीमध्ये भारताचे मानांकन वाढविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक बॅंकेचे आज (शनिवार) आभार मानले. गेल्या तीन वर्षांत भारताने या क्रमवारीत एकूण 42 क्रमांकांची प्रगती केल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

राजधानीतील प्रवासी भारतीय केंद्रातील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवरही टीकास्त्र सोडले. जागतिक बँकेच्या क्रमवारीत भारताची प्रगती झाल्याचे जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला विविध मुद्यांवरून लक्ष्य केले होते. 'मी असा पंतप्रधान आहे, ज्याने 'वर्ल्ड बँके'ची इमारत पाहिलीदेखील नाही.. प्रत्यक्ष 'वर्ल्ड बँक' चालविणारे गेल्या सरकारमध्ये होते.. तरीही ते 'वर्ल्ड बँके'ने दिलेल्या मानांकनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत..', अशी टीका मोदी यांनी केली. 'जीएसटी' लागू झाल्यानंतरचा 'इज ऑफ डुईंग बिझनेस'मधील परिणाम पुढील वर्षीच्या अहवालात दिसून येईल, असेही मोदी म्हणाले. 

'देशात रोजगारनिर्मिती करणे हा केंद्र सरकारचा मुख्य अजेंडा आहे; पण हेच एक आव्हानही आहे', असे मोदी म्हणाले.