पणजीतील बसस्थानकाच्या पहिल्या मजल्याला आग

अवित बगळे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पणजी (गोवा) : पणजीतील आंतरराज्य बसस्थानकाच्या पहिल्या मजल्याला ‌आज सकाळी आग लागली. सकाळी ८.३० च्या सुमारास ही इमारत धुराने वेढली असल्याचे प्रवाशांना दिसून आले.

या बसस्थानकावरून कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाणाऱ्या बस पहाटे पाच वाजल्यापासून निघतात. या बससाठी शेकडो जण बसस्थानकाच्या आवारात वस्तीस असतात. आजही नेहमीप्रमाणे व्यवहार या बस्थानकावर सुरू‌ होते. एवढ्यात पणजी कडील बाजूने बसस्थानकात आलेल्या काही प्रवाशांनी आग लागल्याचे सांगितले. बघता बघता बसस्थानकाची एक बाजू धुराने भरून गेली. प्रवाशांपैकीच एकाने अग्निशमन दलाला आगीबाबत कळवले.

अग्निशमन दलाचे बंब सातेक मिनिटात पोचेपर्यंत बसस्थानकाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या वाहतूक खात्याच्या कार्यालयाला आगीने वेढले होते. या वाहतूक कार्यालयात पूर्वी उत्तर गोव्यातील तर आता तिसवाडी तालुक्यातील वाहनांची नोंदणी, वाहन चालविण्याचे परवाने आदी व्यवहार होत आहेत. ही हजारो कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या इमारतीत कदंब वाहतूक महामंडळ, कोकण रेल्वेचे आरक्षण, सहायक संचालक (तिसवाडी) वाहतूक खाते, सहायक संचालक (अंमलबजावणी) वाहतूक खाते यांची कार्यालये, कदंब कर्मचारी विश्रांती स्थान आणि मोठे वातानुकूलित उपहारगृह आहे.

वर्तुळाकार असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर मजल्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ, कदंब वाहतूक महामंडळ यांची आरक्षण कार्यालये आणि नियंत्रण कक्ष आहेत. त्याशिवाय दोन बॅंक,  सराफांची तीन दुकाने आणि २० दुकाने आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने आग विस्तारली नाही आणि ही मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली. मात्र आगीचे कारण समजले नाही. आग वाहतूक कार्यालयात लागल्याने शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Web Title: marathi news marathi websites Goa news Panaji fire