भाजपकडून माझ्या प्रतिमेचे हनन : राहुल गांधी 

Rahul Gandhi
Rahul Gandhi

अहमदाबाद : पैसा आणि सत्तेच्या जोरावर भाजपने आपली प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कॉंग्रेसचे नवेनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. काल दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर गुजरातच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गुजरातमध्ये कॉंग्रेसचा दणदणीत विजय होईल, असा विश्‍वास राहुल गांधी यांनी या वेळी व्यक्त केला. 

गुजरातच्या निकालाबाबत प्रश्‍न विचारला असता, राहुल यांनी हा निकाल 'जबरदस्त' असेल, असे सांगितले. कॉंग्रेसला केवळ बहुमत मिळणार नाही, तर आश्‍चर्यजनक निकाल लागतील, असा दावाही त्यांनी केला. अध्यक्षपदी निवडीबाबत बोलताना राहुल म्हणाले, की माझा सत्यावर विश्‍वास आहे आणि मी नेहमी खरे बोलतो. मी प्रतिमा बदलली नाही, तर माझी प्रतिमा खराब करण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले.

यासाठी त्यांनी पैसा आणि सत्तेचा वापर केला. केवळ माझी प्रतिमा खराब करण्यासाठी असंख्य माणसे नेमली होती. जे खरे आहे ते हेच आहे. मी सत्याला मानतो आणि तेच सत्य आता आपल्याला दिसत आहे. प्रचारादरम्यान मंदिरात दर्शन घेतल्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, की मंदिरात जाण्यास बंदी आहे का? मला मंदिरात जाणे आवडल्याने मी गेलो. तेथे मी गुजरातच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना केली, जेणेकरून राज्यातील युवकांचे आणि शेतकऱ्यांचे भविष्य चांगले राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com