हा विजय नाही; भाजपचा नैतिक पराभव आहे : ममता बॅनर्जी 

वृत्तसंस्था
सोमवार, 18 डिसेंबर 2017

कोलकाता : गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सत्ता राखण्यात भाजपला यश आले असले, तरीही त्यांच्या जागा गेल्या निवडणुकीपेक्षा कमी झाल्या आहेत. त्यामुळे हा 'भाजपचा नैतिक पराभवच आहे' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक आहेत. 

साडेतीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपशी ममता बॅनर्जी कायम फटकूनच वागत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीवरही त्यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

'या परिस्थितीमध्ये गुजरातमधील मतदारांनी संतुलित निकाल दिला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! हा विजय तात्पुरता आणि कसाबसा मिळविलेला आहे; हा भाजपचा नैतिक पराभवच आहे. गुजरातच्या जनतेने दडपशाही, अस्थिरता आणि सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मतदान केले आहे', अशा आशयाचे ट्‌विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे. 

विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या निकालामुळे 'गुजरातच्या जनतेने 2019 मधील धोकादायक निकालाची पायाभरणी केली आहे' असा इशाराही ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. गुजरातमधील निवडणुकीच्या निकालाचीच पुनरावृत्ती थोड्याफार फरकाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये होईल, असा विविध राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीचे ई सकाळवरील कव्हरेज:

Web Title: marathi news marathi websites Gujarat Elections Narendra Modi Rahul Gandhi Gujarat Results Mamata Banerjee