भाजपची बौद्धिक दिवाळखोरी उघड : राहुल गांधी 

File photo of Rahul Gandhi
File photo of Rahul Gandhi

तिरुअनंतपुरम : गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना भारतीय जनता पक्षाची बैद्धिक दिवाळखोरी उघडी पडल्याची टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली. 

आरएसपीचे नेते बेबी जॉन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, ""गुजरात निवडणुकीच्या प्रचाराने जसजसा वेग घेतला. तसे भाजपचे पितळ उघडे पडले. ते एक मुद्दा दुसरीकडे वळविताना दिसत होते. पहिले ते नर्मदेविषयी बोलत होते. नंतर त्यांनी ओबीसी आणि विकासाचा मुद्दा हाती घेतला. त्यामुळे अखेरीस असा गोंधळ आम्हाला पाहावयास मिळाला.'' 

शेवटच्या तीन-चार दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केवळ स्वतःविषयी बोलणे आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर अवमानकारक टीका इतकेच उरले होते. असा चिमटा राहुल यांनी काढला. दोन टप्प्यांत पार पडलेल्या गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त करत भाजप व आरएसएसवर कडाडून टीका केली. 

काँग्रेससमोर त्यांचा निभाव लागणार नाही; कारण त्यांचा पाया कमकुवत आहे. ते केरळमध्ये आपला जम बसवू पाहत आहेत. मात्र त्यांना असे करण्यापासून रोखणे हे आपले कर्तव्य आहे. असेही राहुल म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com