गुजरात सोडा.. बिहारचे 'एक्‍झिट पोल' आठवताय ना? : तेजस्वी यादव

File photo of Narendra Modi
File photo of Narendra Modi

नवी दिल्ली : दोन महिन्यांच्या राजकीय धुळवडीनंतर 'गुजरातमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा भाजपचाच विजय होणार' असे चित्र दर्शविणाऱ्या 'एक्‍झिट पोल'ची बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खिल्ली उडविली. 'बिहार निवडणुकीचे 'एक्‍झिट पोल' आठवतायत ना' असे ट्विट तेजस्वी यांनी केले. 

गुजरातच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान काल (गुरुवार) झाले. त्यानंतर सायंकाळी विविध वृत्तवाहिन्या आणि राजकीय विश्‍लेषकांनी केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर होण्यास सुरवात झाली. या सर्व मतचाचण्यांमध्ये 'गुजरातची सत्ता भाजपकडेच' हाच एकमेव निकाल दिसला. तसेच, हिमाचल प्रदेशमध्येही सत्ताधारी कॉंग्रेसला भाजप धक्का देणार असल्याचे यातून दिसून आले. 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुजरातमधील 182 पैकी 150 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता. कालच्या कुठल्याही 'एक्‍झिट पोल'नुसार भाजप 150 जागांच्या जवळपास जात नसल्याचा निष्कर्ष आहे. मात्र, भाजपला 99 पेक्षा कमी जागा मिळणेही शक्‍य नाही असेही या सर्व सर्वेक्षणांतून दिसत आहे. 2012 मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेल्या निवडणुकीत भाजपला 115 जागा मिळाल्या होत्या. 

या सर्व 'एक्‍झिट पोल'ची खिल्ली उडविताना लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यांनी 2015 मध्ये झालेल्या बिहार निवडणुकीचा दाखला दिला आहे. त्या निवडणुकीमध्ये भाजपप्रणीत 'एनडीए'चा विजय होईल, असेच भाकीत बहुतांश 'एक्‍झिट पोल'मधून झाले होते. लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येत भाजपचा पराभव केला होता. अर्थात, त्यानंतर काही महिन्यांपूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाला सत्तेतून बाहेर करत भाजपशी हातमिळवणी केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com