हार्दिक पटेलमुळे काँग्रेसचं नुकसानच! 'एक्‍झिट पोल'मधील अंदाज 

Hardik Patel
Hardik Patel

अहमदाबाद : गुजरातमधील अखेरच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध तज्ज्ञांच्या 'एक्‍झिट पोल'चा कानोसा घेतला, तर प्रसिद्धीमाध्यमे आणि काँग्रेसच्या 'थिंक टॅंक'ने महत्त्व दिलेल्या हार्दिक पटेल यांचा राज्यात काहीच प्रभाव पडला नसल्याचे दिसून येते. गुजरातमध्ये तब्बल 22 वर्षे सत्ता राखलेल्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी काँग्रेसला हार्दिक पटेल यांचा फायदा झाला नसल्याचे या सर्व 'एक्‍झिट पोल'मधून दिसून येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या 'होम ग्राऊंड'वर त्यांना चितपट करण्यासाठी काँग्रेसला हार्दिक पटेल हा एक मोठा आधार होता. पाटीदारांच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेल यांनी काढलेल्या मोर्चांना आणि आताही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घेतलेल्या सभांना लाखोंची गर्दी झाली होती. त्यातच, भाजपविरोधात हार्दिक पटेल यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. काँग्रेसनेही पाटीदारांना आरक्षण देण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली होती. त्यामुळे पाटीदारांचे बाहुल्य असलेल्या भागात भाजपला मोठा फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. 

हार्दिक पटेल यांनी निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र, मतदानानंतर जाहीर झालेल्या कोणत्याही 'एक्‍झिट पोल'मध्ये काँग्रेसला वर्चस्व मिळालेले नाही. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर यांच्या मदतीने भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने केलेले प्रयत्न तोकडेच पडल्याचे या सर्वेक्षणांतून दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com