गुजरात निवडणूक : मोदीविरोधकांना काँग्रेसचे निमंत्रण 

Hardik Patel
Hardik Patel

अहमदाबाद : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांना एकत्र आणत निवडणूक लढण्याची रणनीती आखली आहे. या निवडणुकीत पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याच्यासह ठाकूर समुदायाचे नेते अल्पेश ठाकूर आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती काँग्रेसने केली आहे. 

या स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन काँग्रेस भाजपसमोर आव्हान उभे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करणार असल्याचेही संकेत आहेत. जनता दलाचे (संयुक्त) नेते छोटूभाई वसावा यांनाही काँग्रेसने निमंत्रित केले आहे. या सर्व पक्षांच्या व नेत्यांच्या मदतीने काँग्रेस या विधानसभा निवडणुकीत 125 जागांवर विजय संपादन करेल, असा दावा पक्षाचे राज्यप्रमुख भरतसिंह सोळंकी यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे. 

या निवडणुकीत भाजपचा कस लागणार असून, तो काँग्रेसची गांधीनगरच्या दिशेने सुरू असणारी आगेकूच रोखू शकणार नाही. हार्दिक पटेलने उभारलेल्या लढ्याला आपला पाठिंबा असून, त्याने या निवडणुकीत काँग्रेसला समर्थन द्यावे, त्याला तिकीट देण्याचीही पक्षाची तयारी आहे, असे सोळंकी यांनी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, आम आदमी पक्षाचे काही नेते आपल्या संपर्कात असल्याचेही सोळंकी यांनी सांगितले. 

राज्यसभेसाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा विश्वासघात केला. मात्र, तरीही त्यांना या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करण्याची संधी आहे. 
- भरतसिंह सोळंकी, काँग्रेसचे गुजरातप्रमुख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com