चिदंबरम यांच्याकडून काश्मीरच्या स्वायत्ततेचा मुद्दा; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

पीटीआय
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

बंगळूर/ श्रीनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जम्मू- काश्‍मीरच्या स्वायत्ततेचा पुरस्कार केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिदंबरम यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना काश्‍मीरच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्यांचे ते निर्लज्जपणे समर्थन करत असल्याची टीका त्यांनी केली.

दुसरीकडे अनेक वर्षे जम्मू- काश्‍मीरवर सत्ता गाजविणाऱ्या 'नॅशनल कॉन्फरन्स'ने 'जम्मू- काश्‍मीर'च्या स्वायत्ततेसाठीचा संघर्ष सुरूच ठेवण्याची घोषणा करणारा ठराव मंजूर केला. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या चर्चेचाही या पक्षाने पुरस्कार केला. 

बंगळूरमध्ये  भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलताना मोदी म्हणाले, ''कालपर्यंत जे सत्तेत होते त्यांनी आता अचानक यू-टर्न घेतला आहे. काश्‍मीरच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांचे ते निर्लज्जपणे समर्थन करत आहेत.''

तत्पूर्वी राजकोटमध्ये बोलताना चिदंबरम म्हणाले होते की, ''जम्मू- काश्‍मीर ज्या स्वातंत्र्याची मागणी करतो, त्याचा अर्थ हा स्वायत्तता असाच आहे.'' मोदींच्या आजच्या टीकेवर भाष्य करताना ते म्हणाले, ''मोदी हे स्वत:च भुताची कल्पना करून त्यावर हल्ला चढवत आहेत. पंतप्रधानांनी माझे पूर्ण वक्तव्य ऐकलेले नाही. ज्यांना माझ्यावर टीका करायची आहे, त्यांनी आधी माझे वक्तव्य काय आहे, हे अभ्यासावे.'' 

मोदी म्हणाले 
देशातील अंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षेतील जबाबदार व्यक्ती अशाप्रकारचे विधान करते, तेव्हा आम्हाला धक्काच बसतो. देशाला आता काँग्रेसकडून अपेक्षा राहिलेली नाही. सरदार पटेलांनी देशाला एक ठेवण्याचा निर्णय घेतला, हजारो जवानांनी काश्‍मीरसाठी बलिदान दिले आहे. मला बंगळूरमधील जनतेलाच विचारायचे आहे, जवानांच्या बलिदानाचे राजकारण करणाऱ्यांचा देशाला फायदा होईल का? असा सवाल मोदी यांनी केला. त्यांना असे बोलताना लाज वाटत नाही, काँग्रेस पक्षाला या वक्तव्याबाबत उत्तर द्यावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

एखाद्याचे वैयक्तिक मत पक्षाचे मत असलेच पाहिजे असे नाही. जम्मू- काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. 
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे प्रवक्‍ते