जम्मू- काश्‍मीरमध्ये वर्षभरात 42 पोलिस हुतात्मा 

यूएनआय
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

श्रीनगर : गेल्या वर्षभरात जम्मू आणि काश्‍मीर पोलिसचे 42 जवान आपले कर्तव्य बजाविताना हुतात्मा झाले असून, त्यात पोलिस उपअधीक्षकाचाही समावेश आहे, असे प्रतिपादन पोलिस स्मृती दिनानिमित्त आयोजित संचलनाच्या कार्यक्रमात पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी आज येथे केले.

देशात इतर भागात सप्टेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 पर्यंत 328 सुरक्षा जवान हुतात्मा झाले आहेत, अधिकृत नोंदीनुसार अशी माहिती आहे. दरम्यान, गेल्या 28 वर्षात जम्मू आणि काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत आणि दहशतवादी हल्ल्यात एक हजार 622 जवान हुतात्मा झाले आहेत. 

सप्टेंबर 2015 ते ऑगस्ट 2016 पर्यंत जम्मू आणि काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लढताना जम्मू- काश्‍मीर पोलिसचे 42 जवान हुतात्मा झाले आहेत, असे वैद म्हणाले.

गेल्या 28 वर्षांत राज्यात 1622 पोलिस हुतात्मा झाले असून, त्यात एक उपमहानिरीक्षक, एक पोलिस अधीक्षक, 20 उपपोलिस अधीक्षक, 24 निरीक्षक, 34 उपनिरीक्षक, 63 सहायक उपनिरीक्षक आणि 142 हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.

वैद म्हणाले, की पोलिस उपअधीक्षक महंमद अयुब पंडित, उपनिरीक्षक फिरोझ अहमद दर आणि सहायक पोलिस निरीक्षक अब्दुल रशीद यांचे हौतात्म्य जनता कधीच विसरू शकणार नाही. शाब ए कादर येथील ऐतिहासिक जामा मशिदीबाहेर आपले कर्तव्य बजावीत असताना जमावाने केलेल्या हल्ल्यात पंडित यांना हौतात्म्य आले. हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पोलिस विभागाने अनेक प्रकारच्या सोयी केलेल्या आहेत, असे ते म्हणाले.

हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीतही 7 लाखांपासून ते 20लाखांपर्यंत केलेल्या वाढीबद्दल सरकारचे आभार मानीत वैद म्हणाले, की हुतात्मा जवानांना आता 43 लाख रुपयांची मदत करण्यात येत असून, यापूर्वी ती 27 लाख मदत मिळत असे.