'डीएमके'चे अध्यक्ष करुणानिधी रुग्णालयात दाखल 

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

चेन्नई : द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्यक्ष आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना आज (बुधवार) रुग्णालयात दाखल करण्यात आले. करुणानिधी 93 वर्षांचे आहेत. 

करुणानिधी यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडले जाईल, अशी माहिती कावेरी रुग्णालयाने दिली आहे. गेले वर्षभर करुणानिधी आजारी आहेत. चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी करुणानिधी यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. यानंतर डॉक्‍टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. वयाच्या 93 व्या वर्षीही करुणानिधी राजकारणात सक्रिय असले, तरीही अलीकडच्या काळात त्यांची जाहीर कार्यक्रमांतील उपस्थिती कमी झाली आहे. गेले काही महिने राज्यातील घडामोडी आणि विषयांवर करुणानिधी यांची भूमिका प्रसिद्धीपत्रकांद्वारे मांडली जात आहे. 

Web Title: marathi news marathi websites M Karunanidhi DMK Chennai