'पॅराडाइज'शी संबंध असल्याचा मान्यताचा इन्कार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : पॅराडाइज पेपर लीक प्रकरणात अभिनेता संजय दत्त यांची पत्नी मान्यता दत्तचे नाव समोर आले आहे. मात्र, पॅराडाइज पेपरमध्ये नमूद केलेल्या व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे मान्यता दत्त यांनी म्हटले आहे.

पॅराडाइज पेपरच्या मते, मान्यता म्हणजेच दिलनशीन यांनी बहामस येथे नासजे कंपनी लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती आणि दिलनशीन संजय दत्तला या कंपनीचे संचालक, मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि अध्यक्ष, विश्‍वस्त केले होते.

मान्यताने स्वत: कंपनीच्या कागदपत्रावर सह्या केल्या आहेत आणि त्यांचा पत्ता पश्‍चिम मुंबई वांद्रेचा दिला होता. मात्र, कंपनी परदेशात काम करत होती, असे पॅराडाइज पेपरमध्ये म्हटले आहे.

यासंदर्भात मान्यता दत्तच्या प्रवक्‍त्याने म्हटले की, प्राप्तिकर नियम 1961 नुसार सर्व संपत्ती, मालमत्ता, कंपनीतील शेअरची माहिती ताळेबंदमध्ये जाहीर केली आहे. पॅराडाइज पेपरमध्ये 714 भारतीयांचे नाव असून, त्यात मान्यता दत्तचा समावेश आहे. 

Web Title: marathi news marathi websites Paradise Papers Manyata Dutt