पेट्रोल-डिझेलच्या दरांत दोन रुपयांची कपात 

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

इंधनाचे दर सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसत होती. यामुळे सरकारविरोधात असंतोषही निर्माण होत होता. या पार्श्‍वभूमीवर विविध राजकीय पक्षांनीही केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली होती. या सर्वांची दखल घेत केंद्र सरकारने अखेर अबकारी करात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. 

नवी दिल्ली : इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे देशभरातील असंतोष पाहता केंद्र सरकारने अखेर आज (मंगळवार) इंधनावरील अबकारी करात दोन रुपयांची कपात केली. यामुळे आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रति लिटर दोन रुपयांची कपात होणार आहे. 

इंधनाचे दर सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसत होती. यामुळे सरकारविरोधात असंतोषही निर्माण होत होता. या पार्श्‍वभूमीवर विविध राजकीय पक्षांनीही केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली होती. या सर्वांची दखल घेत केंद्र सरकारने अखेर अबकारी करात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. 

या कपातीमुळे केंद्र सरकारला एका वर्षात जवळपास 26 हजार कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. यंदाच्या उर्वरित आर्थिक वर्षातील हा तोटा 13 हजार कोटी इतका असेल, असा अंदाज अर्थ मंत्रालयाने वर्तविला आहे.