गुरमीत सिंगच्या शिक्षेनंतर 'डेरा सच्चा'चे समर्थक हिंसक; पंचकुलामध्ये घातला धुडगूस 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पंचकुला : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या परिसरात धुडगूस घातला. या हिंसक जमावाने वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅन्स जाळल्या. तसेच इतर गाड्यांचीही तोडफोड केली. पोलिस आणि डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांमध्ये झालेल्या धुमश्‍चक्रीत किमान पाच जण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. 

या जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी निमलष्करी दल आणि पोलिसांनी अश्रुधुराचाही वापर केला. यानंतर जमावातील काही जणांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र दिसत होते. 

गुरमीत सिंग यांना दोषी ठरविल्यामुळे हा जमाव संतप्त झाला आहे. वास्तविक, या परिसरामध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तरीही गुरमीत सिंग यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात येथे दाखल झाले आणि त्यामुळेच आता हा जमाव हिंसक झाला असल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, गुरमीत सिंग यांना रोहतक येथील तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. 'सीएनएन-न्यूज18'ने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील दोन रेल्वे स्थानकांना जमावाने आग लावली आहे; तर 'एनडीटीव्ही'च्या वृत्तानुसार पंजाबमधील भटिंडासह काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियानामध्ये विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीत माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस जखमी झाले आहेत. 

'डेरा सच्चा सौदा' आणि गुरमीत राम रहीम सिंग प्रकरण नेमके आहे तरी काय?

या हिंसात्मक प्रतिक्रियेमुळे राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवरही 'हाय ऍलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. 

राजस्थानमधील हनुमानगड आणि श्रीगंगानगर येथेही प्रशासनाने मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत केली आहे. तसेच येथील सुरक्षा व्यवस्थेमध्येही वाढ करण्यात आली आहे.