मुस्लिम महिलांच्या आयुष्यातील नव्या पर्वास सुरवात : अमित शहा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : तोंडी तलाकविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वागत केले. 'या निर्णयामुळे मुस्लिम महिलांच्या आयुष्यातील नव्या पर्व सुरू झाले आहे' अशी प्रतिक्रिया शहा यांनी व्यक्त केली. 

पत्रकार परिषदेमध्ये शहा म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हा निर्णय म्हणजे कुणाचा विजय किंवा कुणाचा पराजय अशा दृष्टिकोनातून पाहू नये. किंबहुना, हा समतेचा आणि मानवी हक्कांचा विजय आहे. या निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने कोट्यवधी मुस्लिम महिलांना समानतेने जगण्याचा हक्क दिला आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी झगडणाऱ्या त्या सर्व महिलांच्या वतीने आम्ही या निर्णयाचे स्वागतच करतो.'' 

'मुस्लिम महिलांच्या स्वाभिमानाचे आणि समतेचे नवे पर्व आजपासून सुरू झाले आहे. भाजपचा या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे. 'न्यू इंडिया'च्या दिशेने जाणारे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल,' अशी आशाही शहा यांनी व्यक्त केली.