''हुतात्मा पोलिसांच्या वारसांना जादा मदत''

यूएनआय
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

लखनौ : कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या मदतीत दुप्पटीने वाढ करण्यात आल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. 

पोलिस स्मृती दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. योगी आदित्यनाथ म्हणाले, ""सरकारच्या या निर्णयामुळे आता हुतात्मा पोलिसांच्या वारसांना सुमारे 50 लाख रुपये मदत उपलब्ध करून देण्यात येणार असून, याबरोबर विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्येही मोठ्या संख्येने वाढ करण्यात आली आहे.'' 

यापूर्वी वारसांना 20 लाख रुपये मदत म्हणून अदा केले जात होते. आता त्यात दुपटीने वाढ करण्यात आली असून, त्यांच्या पालकांना आता पाचऐवजी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. हुतात्मा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सुमारे 400 मुलांना सरकारी नोकरीची ऑफर देण्यात आल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

आपले सरकार हुतात्मा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.