'पद्मावती'च्या वादात मेवाड राजघराणे करेल मध्यस्थी

padmavati-release
padmavati-release

नवी दिल्ली : 'पद्मावती'ला देशभरातून तीव्र विरोध होत असतानाच, आता राजपूत कर्णी सेना सावध पवित्रा घेताना दिसत आहे. 'संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा वादग्रस्त चित्रपट मेवाडच्या राजघराण्यातील शाही कुटुंबाला दाखवायला हवा, जर त्यांना चित्रपटात काही आक्षेपार्ह सापडले नाही तर आम्ही आमचे आंदोलन मागे घेऊ.' असे राजपूत कर्णी सेनेने जाहीर केले आहे. तसेच हा चित्रपट राजपूत कर्णी सेनेच्या प्रतिनिधींसमोरही दाखवायला हवा, असा आग्रह त्यांनी यावेळी धरला. 

14व्या शतकातील राजा रावल रतन सिंग यांचे वारस अरविंद सिंग मेवाड यांनी 'भन्साळी यांची इच्छा असेल तर या वादग्रस्त मुद्दयात मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा मी प्रयत्न करेन' असे सांगितले. 'जेव्हा कलेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लाखो लोकांच्या भावना दुखावते, तेव्हा ते सहन केले जाणार नाही.' असे वक्तव्य कर्णी सेनेने केले आहे.                       
'आम्ही कलेच्या किंवा दिग्दर्शकांच्या विरोधात नाही, पण जर इतिहासातील घटनांची मोडतोड करून आणि राजपूतांची शान कमी करणारी कलाकृती तयार होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.' असे राजपूत कर्णी सेनेचे प्रमुख कळवी यांनी सांगितले. 

भारतात 'पद्मावती'संदर्भात इतके वाद चालू असताना, ब्रिटनमध्ये 'पद्मावती' प्रदर्शित करण्यास परवानगी मिळाली आहे. पण, भारतात परवानगी मिळाल्याशिवाय इतर कुठेही    चित्रपट प्रदर्शित होणार नाही, अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com