जातीयवाद रोखण्यात मोदी पडले कमी- 'प्यू'चे निरीक्षण

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली लोकप्रियता कायम राखली असली तरी विविध धार्मिक समुदायांशी सलोख्याचे संबंध जोपासण्यात आणि वायू प्रदूषणाची समस्या हाताळण्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नसल्याचे समोर आले आहे. 

प्यू या थिंक टँक कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून एक राजकारणी म्हणून मोदींनी 'अव्वल' स्थान प्राप्त केले आहे. या सर्वेक्षणात 2464 जणांकडून माहिती विचारण्यात आली. यामध्ये मोदींना 88 टक्के मते मिळाली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मोदींपेक्षा 30 टक्के मते कमी मिळाली आहेत. राहुल गांधींना 58 टक्के मते मिळाली असून, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राहुल यांनी मागे टाकले आहे. सोनिया गांधी यांना 57 टक्के मते मिळाली असून, त्या मोदींपेक्षा 31 टक्के मतांनी पिछाडीवर आहेत. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 39 टक्के मिळाली आहेत. 

त्यांना देशातील सांप्रदायिकता हाताळण्यासाठी तुलनेने कमी गुणांकन मिळाले आहे. या सर्वेक्षणामध्ये त्यांना 50 टक्के कमी मते मिळाली आहेत. याशिवाय देशातील वाढती वायू प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यातही अडचणी आल्या आहेत. सांप्रदायिता आणि वायू प्रदूषणाची समस्या हाताळण्याबाबत उत्तर भारताच्या शहरी भागातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोक कमी प्रमाणात पाठिंबा देत असल्याचे दिसून आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com