मुख्यमंत्री जामिनावर बाहेर अन् काँग्रेस भ्रष्टाचारावर बोलते- मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मोदी म्हणाले, "वीरभद्रसिंह हे जामिनावर बाहेर आहेत. हिमाचल प्रदेशातील कोणीतरी काँग्रेसवर विश्वास ठेवतील का?

हिमाचल प्रदेशांचे मुख्यमंत्र्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. असे असताना आम्ही भ्रष्टाचाराबाबत सहिष्णूता दाखवणार नाही (झिरो टॉलरन्स) असे काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. यावर अगदी लहान मुलेही विश्वास ठेवणार नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

हिमाचल प्रदेशच्या निवडणूक प्रचारानिमित्त कांगरा येथे आयोजित सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसचा शाब्दिक हल्ला चढवला. काँग्रेसच्या जाहिरनाम्याची खिल्ली उडवताना मोदी म्हणाले, "वीरभद्रसिंह हे जामिनावर बाहेर आहेत. हिमाचल प्रदेशातील कोणीतरी काँग्रेसवर विश्वास ठेवतील का? वीरभ्रद्रसिंह यांच्यावर काय आरोप आहेत ते मोठ्याने सांगा म्हणजे कांगरातील वाहिन्या आणि देशाला ऐकू जाईल."

हिमाचलचे 83 वर्षीय मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्याविरोधात 10 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. हिमाचल प्रदेशला लुटणाऱ्यांना 9 नोव्हेंबर रोजी 'रामराम' तुम्हाला संधी आहे, असे मोदी यांनी सांगितले.