बुंदेलखंडात 20 हजार कोटींचे संरक्षण औद्योगिक क्षेत्र : पंतप्रधान मोदी

Narendra Modi
Narendra Modi

लखनौ : उत्तर प्रदेशातील मागास समजल्या जाणाऱ्या बुंदेलखंडमध्ये संरक्षण औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली. 

'उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदे'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मोदी म्हणाले, ''देशात दोन ठिकाणी संरक्षण औद्योगिक क्षेत्राच्या प्रस्तावाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यातील एक बुंदेलखंडमध्ये उभारण्यात येईल. यामुळे या भागात वीस हजार कोटींची गुंतवणूक येईल. त्यातून अडीच लाख लोकांना रोजगार मिळेल. उत्तर प्रदेश सरकारकडे प्रचंड क्षमता आहे. धोरण, नियोजनाच्या आधारे राज्यात विकास घडविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यातील जनता सिद्ध आहे.'' 

ते म्हणाले, ''उत्तर प्रदेशात गुंतवणूकदारांची परिषद भरवून आदित्यनाथ सरकारने आधीच्या नकारात्मक वातावणाला मागे सारले आहे. त्यांनी जनतेला सकारात्मक बदलांचा आशेचा किरण दाखविला आहे. योगींचे 'एक जिल्हा, एक उत्पादन' धोरण राज्यात गेमचेंजर ठरेल. जेवार व खुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जाईल.'' 

मोदी म्हणाले, ''राज्यात आधी भीतीचे वातावरण होते. लोकांप्रमाणेच गुंतवणूकदारांवरही याचा परिणाम होत असे. आता प्रत्येक करार मुख्यमंत्री स्वतः पाहणार आहेत. गुंतवणूकदारांना आता लाल फितीऐवजी लाल गालिचा अंथरल्याचा अनुभव येईल. उत्तर प्रदेशात पर्यटनाच्या क्षेत्रात भरपूर क्षमता आहेत. राज्याचे नवे पर्यटन धोरण या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणेल.'' 

या पषिदेत मॉरिशसचे माजी पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांच्यासह सात देशांतील उद्योजकांचे शिष्टमंडळ भाग घेत आहे. त्याचप्रमाणे मुकेश अंबानी, गौतम अदानी, सुभाष चंद्रा, कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह दोनशेहून अधिक उद्‌योगपती सहभागी होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com