रॅगिंगप्रकरणी 54 विद्यार्थिनींना प्रत्येकी 25 हजारांचा दंड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

दरभंगा : दरभंगा वैद्यकीय महाविद्यालयातील 54 विद्यार्थिनींना रॅगिंगप्रकरणी प्रत्येकी 25 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रॅगिंगप्रकरणी दंड ठोठावण्याची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे.  

दरभंगा महाविद्यालयातील दंड ठोठावण्यात आलेल्या विद्यार्थिनी या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या आहेत. यातील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या रॅगिंगप्रकरणात सामील झाल्यामुळे तर पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पीडितांची ओळख नाकारल्याने अशा 54 विद्यार्थिनींना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

"पहिल्या वर्षात शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींनी महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार केला जात असल्याची तक्रार मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे केली होती. या प्रकरणाची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने गंभीर दखल घेत याप्रकरणात समावेश असलेल्या विद्यार्थिनींवर कडक कारवाई करावी, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर रॅगिंगविरोधी समितीकडून तातडीची बैठक घेण्यात आली. समितीच्या सदस्यांनी मुलींच्या वसतिगृहात जाऊन याबाबतची चौकशी केली. मात्र, यावर बोलण्यास वरिष्ठ किंवा कनिष्ठ विद्यार्थिनींनी नकार दिला, अशी माहिती दरभंगा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. सिन्हा यांनी दिली. 

"मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार अशाप्रकारच्या घटनांसाठी संबंधित विद्यार्थ्याला 25 हजार रुपये दंड ठोठावण्याची तरतूद आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थिनींनी 25 नोव्हेंबरपर्यंत दंडाची रक्कम जमा करायला हवी. अन्यथा संबंधित विद्यार्थिनींवर पुढील कारवाई करण्यात येईल", असेही सिन्हा म्हणाले.   

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भागलपूर येथील जवाहलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयील विद्यार्थ्यांना आपल्या कनिष्ठ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याच्या आरोपावरुन दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com