आसाममध्ये 6 हत्तींना रेल्वेने उडवले

Elephant
Elephant

सोनितपूर : आसाममध्ये रेल्वेने सहा हत्तींना उडवले असून, हत्ती रेल्वेखाली येऊन ठार झाले. ही घटना रात्री 1 च्या सुमारास घडल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातील बलिपरा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या गुवाहटी-नहारलागन एक्स्प्रेसने सहा हत्तींना उडवले. यामध्ये हत्तीच्या एका बछड्याचा समावेश आहे. बलिपरा हा भाग हत्तींचा परिसर म्हणून ओळखला जातो. झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याने हत्तींचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील बहुतांश हत्ती इतरत्र फिरत आहेत. तसेच यातील सहा हत्ती रेल्वेरुळ पार करत असताना भरधाव येणाऱ्या रेल्वेने त्यांना उडवले. यामध्ये हे सहाही हत्ती जागीच ठार झाले. 

दरम्यान, आसाममध्ये 2013 आणि 2016 यादरम्यान 140 हत्ती अनैसर्गिकरित्या दगावले असल्याची माहिती मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com