'कॅश फॉर जॉब'प्रकरणी 10 अधिकारी निलंबित ; आसाम सरकारची कारवाई

apsc office pic
apsc office pic

गुवाहटी : आसाम लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नोकरीमध्ये कायम करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या 10 अधिकाऱ्यांना आसाम सरकारने निलंबित केले आहे. यामध्ये 23 अधिकाऱ्यांचा समावेश असून, सध्या 10 अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.  

आसाम सरकारच्या अखत्यारित असलेल्या आसाम लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेअंतर्गत उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीत कायम केले जाते. दंतचिकित्सक असलेल्या उमेदवारांना नोकरीत कायम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी 10 लाखांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार संबंधितांनी दाखल केल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. यातील अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत यातील अधिकाऱ्यांना आसाम सरकारने निलंबित केले आहे. 

याप्रकरणात 23 जणांचा समावेश असून, यातील 10 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेले 10 अधिकारी हे आसाम नागरी सेवा आणि इतर सेवेतील असल्याची माहिती मिळत आहे. यातील काही अधिकारी हे 2015 च्या बॅचचे अधिकारी असून, अन्य 13 आयसीएस आणि आयपीएस तर काही अधिकारी हे इतर सेवेतील आहेत. 
 
दरम्यान, यातील 14 अधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ताक्षरातील बनावट उत्तरपत्रिकांसह ताब्यात घेतले आहे. या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 


   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com