कारमधून फरफटत नेत महिलेवर बलात्कार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जानेवारी 2018

एका 22 वर्षीय महिलेला कारमधून फरफटत बाहेर नेत बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना टिग्रा गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली.

गुडगाव : एका 22 वर्षीय महिलेला कारमधून फरफटत बाहेर नेत बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना टिग्रा गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली.

पोलिसांनी यातील पाचही आरोपींना अटक केली असून, त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यातील पाचवा आरोपी पवन शर्मा याला टिग्रा गावातून रात्री उशीरा अटक करण्यात आली. या घटनेदरम्यान आरोपींनी कोणत्याही प्रकारे शस्त्राचा वापर केला नाही, अशी माहिती गुडगाव पोलिस प्रवक्ते रविंद्र कुमार यांनी सांगितले. तसेच यातील चौघांची ओळख पटली असून, देशवीर, धर्मेंद्र, पवन आणि संजित अशी त्यांची नावे आहेत. या सर्व आरोपींना जोल्का गावातून सोमवारी दुपारी अटक करण्यात आली. 

दरम्यान, पोलिसांनी संजितविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, अन्य चार आरोपींविरोधात पीडित महिलेचा पती आणि इतर नातेवाईकांना मारहाण केल्याच्या आरोपातून गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींकडून दोन मोटारसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत. 
 

Web Title: Marathi News National Crime Gurgaon Woman dragged out of car raped on roadside five men arrested