बँकेशी 'आधार' लिंक करण्यास मुदतवाढ

Aadhar
Aadhar

नवी दिल्ली : देशातील विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 'आधार' लिंक करणे बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करण्यासाठी यापूर्वी 31 डिसेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आली. मात्र, आता ही डेडलाईन वाढवण्यात आली आहे. याची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

केंद्र सरकारने काल (मंगळवार) प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट, 2002 च्या कायद्यात बदल केल्याने आधार किंवा पॅन क्रमांक सरकारने दिलेल्या तारखेत बँक खात्याशी जोडण्यात यावे, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता ही डेडलाईन वाढवण्यात आली आहे. याबाबत उद्यापासून (गुरुवार) सुनावणी होणार आहे. आधार क्रमांक बँक खात्यांशी जोडणे बंधनकारक करण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर उद्या सुनावणी सुरु होणार आहे. 

दरम्यान, यापूर्वी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानंतर मोबाईलधारकांच्या सोयीसाठी 1 जानेवारीपासून घरबसल्या मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com