गुजरात विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर

गुजरात विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 70 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना राजकोट पश्चिममधून तर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना मेहसानामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 5 जणांना उमेदवारी दिली गेली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गुजरात विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचे सांगितले जात होते. आज या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या यादीला अंतिम स्वरुप देण्यात आले.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गढ समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने राजकीय मैदानात उडी घेत जोरदार प्रचार सुरु आहे. तसेच पाटीदार समाजामध्येही शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्यावरुन तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com