गुजरात विधानसभा निवडणूक ; मतदानाला सुरवात

VOTE
VOTE

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज (गुरुवार) सकाळपासून सुरवात झाली. या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 851 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य मतपेटीत आज बंद होणार आहे.

भाजप आणि काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला. या निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे करणारे दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकूर यांचेही भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपसह काँग्रेसने जोरदार प्रयत्न केला. या निवडणुकीत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकूर या नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि हार्दिक पटेलने यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन यांनी गांधीनगरमधून मतदान केले. या निवडणुकीची मतमोजणी 18 डिसेंबरला होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com