...तर मी पोलिसांना धडा शिकवला असता : केजरीवाल

kejriwal
kejriwal

नवी दिल्ली : 'जर दिल्ली पोलिस आमच्या नियंत्रणात असते तर आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवला असता', असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केजरीवालांकडून टीका केली जात आहे. त्यानंतर आता त्यांनी पोलिस यंत्रणेबाबत वक्तव्य केले आहे.

आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य आणि आपचे सोशल मीडिया प्रमुख अंकित लाल यांच्या 'इंडिया सोशल' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केजरीवाल बोलत होते. आपची दिल्लीत सत्ता आल्यापासून केजरीवाल त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काही अधिकारांबाबत उघडपणे बोलत आहेत. दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश असल्याने या राज्यातील बहुतांश निर्णय हे केंद्रीय स्तरावर घेतले जातात. या अधिकारांच्या मुद्यावरूनच काही महिन्यांपूर्वी दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग आणि केजरीवाल यांच्यात खडके उडत होते. त्यानंतरही केजरीवालांनी आपल्या अधिकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. 

आम आदमी पक्ष सत्तेत आल्यावर त्यांनी पोलिस यंत्रणा राज्य सरकारच्या नियंत्रणात यावी, अशी मागणी केंद्राला केली होती. काही लोक सोशल मीडियावर महिलांची बनावट अकाऊंट तयार करुन त्यांना धमकावतात आणि त्यांना त्रास देतात, अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी कडक पावले उचलली गेली पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले. 

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या दोन ट्रेंड जास्त चालत आहेत, जर तुम्ही त्यांच्या नेत्यावर टीका केली किंवा त्यांचे व्यंगचित्र काढले तर तुम्हाला अटक केली जाते. पण जर त्या नेत्याने कोणाला मारले तर तो सुरक्षित असतो, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com