इंटरनेट स्पीडमध्ये भारत 'स्लो'

high speed
high speed

नवी दिल्ली : भारतामध्ये सध्या 2जी, 3जी आणि 4जीसारखा इंटरनेट स्पीड दिला जात आहे. आपल्याला हा स्पीड जास्त वाटतोही मात्र, भारत जगाच्या इंटरनेट स्पीडच्या तुलनेत 'स्लो' असल्याची माहिती समोर आली आहे. जगातील पहिल्या 100 देशांच्या यादीतही भारताला स्थान मिळालेले नाही. '

'ओक्ला' या संस्थेने मोबाईल इंटरनेट स्पीडबाबत सर्वेक्षण केले होते. यामध्ये ही बाब पुढे आली आहे. इंटरनेटच्या स्पीडमध्ये सध्या भारत जगात 109 व्या स्थानावर आहे. तर ब्राँडबँड स्पीडमध्ये 76 व्या स्थानी आहे. या वर्षाच्या सुरवातीला भारतातील मोबाईल डाऊनलोडिंगचा सरासरी स्पीड 7.65 एमबीपीएस इतका होता. वर्षभरात या स्पीडमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये इंटरनेटचा स्पीड 8.80 एमबीपीएस इतका होता. आताच्या आणि सुरवातीच्या इंटरनेट स्पीड लक्षात घेता इंटरनेटच्या स्पीडमध्ये 15 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. मात्र, इतर देशांत इंटरनेटचा स्पीड चांगलाच 'हाय' आहे. 

नॉर्वेमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक म्हणजे 62.66 एमबीपीएस आणि नेदरलँडमध्ये 53.01 एमबीपीएस आहे. तर आईसलँडमध्ये 52.78 एमबीपीएस इतका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com