आता 'ओटीपी'च्या माध्यमातून मोबाईल करा 'आधार'शी लिंक 

link
link

नवी दिल्ली : सध्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 'आधार' लिंक करणे बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच मोबाईल क्रमांकही आधारशी लिंक करण्यासाठी फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही असंख्य मोबाईलधारकांनी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केला नाही. त्यामुळे आता नवी योजना राबवण्यात येणार असून, या योजनेनुसार घरबसल्या ओटीपीच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करता येऊ शकतो.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे सुरक्षाविषयक प्रश्न उपस्थित केल्याने न्यायालयाने सर्व मोबाईलधारकांना त्यांचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्यास सांगितले होते. त्त्यासाठी फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यानंतर या प्रक्रियेला सुरवात झाली. मात्र, मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात होत्या. तसेच 50 कोटींहून अधिक ग्राहकांनी अद्याप मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केलेला नाही.

त्यामुळे या सर्व मोबाईलधारकांच्या सोयीसाठी 1 जानेवारीपासून घरबसल्या मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करता येऊ शकतो. यासाठी व्हॉइस गाईडेड प्रणालीच्या माध्यमातून आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. त्यानंतर संबंधित मोबाईलधारकाला वन टाईम पासवर्ड त्यांच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल. त्यानंतर त्या क्रमांकाच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करता येऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com