श्रीदेवींच्या निधनाने बॉलीवूड हळहळले

National News Actress Shridevi Died Amitabh Bachchan Bollywood
National News Actress Shridevi Died Amitabh Bachchan Bollywood

मुंबई : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले.

त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी शोक व्यक्त केला. चित्रपटसृष्टीतील या सर्व दिग्गजांनी ट्विटरवर शोक व्यक्त करत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

''काय माहिती नाही, न कळत कोणत्यातरी एका गोष्टीची भीती वाटते''.

- अमिताभ बच्चन, ज्येष्ठ अभिनेते 

''श्रीदेवींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मी अत्यंत अस्वस्थ झालो. मी माझी प्रिय मैत्रिण गमावली आणि चित्रपटसृष्टीने एक दर्जेदार अभिनेत्री गमावली. मी या बातमीने अत्यंत दु:खी झालो. त्या नेहमी आमच्या आठवणीत राहतील''.

- रजनीकांत, दाक्षिणात्य सुपरस्टार

''मी श्रीदेवींच्या बालपणीपासूनचा साक्षीदार आहे. त्या उत्तम अभिनेत्री ठरल्या होत्या. त्यांनी त्यांची प्रसिद्धी कायम ठेवली होती. त्यांच्यासोबत व्यतित केला प्रत्येक आनंदाचा क्षण माझ्या लक्षात आहे. त्या सदैव आमच्या आठवणीत राहतील''.

- कमल हसन, अभिनेते

''ही बातमी ऐकून अत्यंत धक्का बसला. श्रीदेवी आणि माझे बोलणे अजूनही सुरु होते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच धक्का बसला. मला अजूनही यावर विश्वास बसत नाही. त्या अत्यंत उत्तम अभिनेत्री होत्या. त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. त्यांच्या निधनामुळे मोठे नुकसान झाले''

- काजल, अभिनेत्री

''मी चित्रपटसृष्टीत येण्याचे मुख्य कारण म्हणजे श्रीदेवी यांना मला जवळून पाहायचे होते. 'क्षणाक्षणाम' या चित्रपटातून मी त्यांना प्रेमपत्र दिले होते''.

- राम गोपाल वर्मा, चित्रपट दिग्दर्शक

''श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच मला धक्का बसला. त्यांच्या निधनाने जगाने अत्यंत उत्तम अभिनेत्री गमावली. त्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो''.

-  नवाझुद्दीन सिद्दिकी, अभिनेता

''भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्तम अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच अत्यंत दु:ख झाले. आम्ही त्यांच्या परिवाराचे सांत्वन करतो''.

- नुपूर शर्मा

''ही बातमी ऐकून मला धक्का बसला. मी या बातमीमुळे अत्यंत दु:खी झाले. श्रीदेवी या अत्यंत तरुण अभिनेत्री होत्या. त्यांच्या निधनाने मी मनापासून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करते. त्यांच्या अडचणींच्या काळात त्यांच्यासोबत सदैव असेन''.

- सोहा अली खान, अभिनेत्री

''श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीवर माझा विश्वासच बसत नाही. एक आदर्श अभिनेत्री श्रीदेवी या जगातून गेल्या. याबाबतची बातमी ऐकून मला धक्काच बसला. माझी प्रार्थना सदैव त्यांच्या कुटुंबीयांसोबत असेल मी त्यांचे सांत्वन करतो''.

- राहुल देव, अभिनेता

''आधी रिमा लागू त्यानंतर आता श्रीदेवी या दोघी अत्यंत उत्तम यशस्वी महिला होत्या. त्या प्रसिद्धी झोतात होत्या. त्यांच्यासोबत व्यतित केलेला प्रत्येक क्षण कायम लक्षात राहिल''. 

- अभिनेत्री प्रियंका चोप्रा


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com