'पीएनबी'चे व्यवस्थापन गैरव्यवहाराला जबाबदार : अरुण जेटली यांची टीका 

National News Arun Jaitley on PNB Scam
National News Arun Jaitley on PNB Scam

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) गेली सात वर्षे सुरू असलेला गैरव्यवहार शोधता आला नाही, अशी टीका करत शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बॅंकेच्या व्यवस्थापनाला या गैरव्यवहारासाठी जबाबदार धरले. 

जेटली म्हणाले, की या गैरव्यवहारात बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग चिंताजनक आहे. तसेच एवढी वर्षे गैरव्यवहार सुरू असूनही तो उघड न होणे ही धोकादायक बाब आहे. नियामक संस्थांनी असे गैरव्यवहार शोधण्यासाठी आणि ते आटोक्‍यात आणण्यासाठी तिसरा नेत्र उघडण्याची आवश्‍यकता आहे. बॅंकिंग यंत्रणेने भ्रष्ट व्यवस्थेचा हा डाग पुसून काढावा. कर्ज देणारा आणि घेणारा यांच्यातील अनैतिक संबंध संपुष्टात यायला हवेत. यासाठी गरज पडल्यास कठोर कायदे करण्यात येतील. 

बॅंकेत काय सुरू आहे हे शोधण्यात बॅंकेचे व्यवस्थापन अपयशी ठरले आहे. ही बाबही चिंतेची आहे. या गैरव्यवहारात बॅंकिंग क्षेत्रातील नियामक संस्था आणि राजकारणी यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com