प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

वृत्तसंस्था
रविवार, 14 जानेवारी 2018

दिल्लीतील जामा मशिद परिसरातील तीन संशयित दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व दहशतवादी प्रजासत्ताकदिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्याकडून व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : देशातील गुप्तचर विभागाकडून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील जामा मशिद परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर हा हाय अलर्ट जारी करण्यात आला.  

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो. दिल्लीतील जामा मशिद परिसरातील तीन संशयित दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व दहशतवादी प्रजासत्ताकदिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्याकडून व्यक्त केली जात आहे. दहशतवादी अफगाणिस्तानचे असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.

या सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये  प्रशिक्षण देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर देशातील अन्य प्रमुख शहरांतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

Web Title: marathi news national news india on high alert ahead of republic day