अनिवार्य उपस्थितीवरून "जेएनयू'मध्ये वाद 

National News JNU Attendance Mandatory Clashes
National News JNU Attendance Mandatory Clashes

नवी दिल्ली : शिष्यवृत्ती आणि इतर सुविधा मिळविण्यासाठी महाविद्यालयामध्ये 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नव्या परिपत्रकामुळे वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी या नव्या नियमाचा निषेध करत विद्यापीठ प्रशासनावर टीका केली आहे. 

विद्यापीठाने एक परिपत्रक काढत शिष्यवृत्ती आणि इतर सुविधा मिळविण्यासाठी पूर्ण वेळ आणि अर्धवेळ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे जाहीर केले. यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत विद्यापीठात मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. याबाबत चर्चा करण्यासाठी कुलगुरूंचीही भेट होऊ न शकल्याने चिडलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय विभागाला टाळेही ठोकले होते. विद्यापीठाच्या दोन अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याबद्दल पोलिसांनी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com