मोदींनी नोकऱ्यांचे आश्वासन दिलेच नाही : केंद्रीयमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जानेवारी 2018

''लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दरवर्षी 1 कोटी तरूणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मोदींनी नोकरीचे आश्वासन कधीच दिले नव्हते. नोकरी म्हणजे सरकारी नोकरी नसून, मोदींनी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते''

शिवप्रताप शुक्ला, केंद्रीय अर्थराज्यमंत्री

 

मुंबई : ''लोकसभा निवडणूक 2014 च्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे आश्वासन दिलेच नव्हते'', असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केले. मोदींनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते, असेही ते म्हणाले. 

शुक्ला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले. पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत भाषणे केली होती. यावर शुक्ला यांना सरकार नोकरीचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी झाले का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ''लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दरवर्षी 1 कोटी तरूणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मोदींनी नोकरीचे आश्वासन कधीच दिले नव्हते. नोकरी म्हणजे सरकारी नोकरी नसून, मोदींनी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते'', असे स्पष्टीकरण शुक्ला यांनी दिले. 

Web Title: Marathi News National News Minister Of State For Finance ShivPratap Shukla On Employment Job In India Modi Government did not gave any assurance